पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) परीक्षेचा विचार केला तर ग्रामीण भागातच खरे टँलेंट दडले असुन ते पुढे आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जि.प. सदस्य कैलास पाटील यांनी आज (दि.४) येथे केले. यावेळी येथील ज्ञानसाधना अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांकडे क्षमता असते, परंतु परिस्थितीमुळे त्यांना पुस्तके घेता येत नाहीत, त्यासाठी अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य असल्याच्या भावनेतून त्यांनी ही पुस्तकांची भेट दिली आहे. पाळधी विकास सोसायटीच्या सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या प्रमिला राघो पाटील ह्या होत्या. उपस्थितांमध्ये गणेश पुंडलिक पाटील, भगवान धनगर, पितांबर पाटील, रामलाल इंगळे, विठ्ठल शिंदे, एकनाथ चौधरी, दिगंबर माळी, संजय करवंदे, भानुदास पाटील, पंढरी पाटील, आबा पाटील, रमेश पाटील, विकास सोनवणे, राजू शेळके, संभाजी शेळके व ज्ञानसाधना अभ्यासिकेचे विद्यार्थी उपस्थित होते.