खिरोदा अध्यापक विद्यालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भावी शिक्षक होण्यासाठी शासनाने टीईटी ,सीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. त्याची पुर्वतयारी विद्यार्थ्यांना करता यावी, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शक डॉ. हर्षल कुलकर्णी होते. त्यांनी विविध शासकीय पदे, त्यांची पात्रता, अभ्यास कसा करावा स्वतः मध्ये बदल कसा करावा व कौशल्यावर प्रभुत्व कसे मिळवावे. एकच विचार घेवून तो विचार तुमचे ध्येय बनवा यश तुमच्या पदरात पडल्याशिवाय रहाणार नाही. कोणत्या लेखकाची पुस्तके वापरावी, याबद्दल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता शिक्षण मंडळाचे  सचिव प्रभात चौधरी होते. आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगीतले की, अशा कार्यक्रमांचे आयोजन झालेच पाहिजे, यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर असलेली मरगळ निघून जाते. यावेळी प्राचार्य मा.डॉ.सौ.प्रतिभा बोरोले व शिक्षकवृंद उपस्थित होते . सुत्रसंचालन प्रा.सौ.हेमांगी चौधरी यांनी केले आभार प्रा.अरुण सोनवणे यांनी केले.

Protected Content