जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेतील अनुकंपाधारकांना नियुक्ती मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून आता त्यांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, महापालिकेतील अनुकंपाधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून नियुक्तीची प्रतिक्षा आहे. यामुळे अनुकंपाधारक तरूण-तरूणींनी दिनांक ८ फेब्रुवारी रोजी उपोषणाचा मार्ग पत्करला होता. आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते.
दरम्यान, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी या प्रकरणी संबंधीतांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती. ना. तनपुरे यांनी याची दखल घेत जळगाव महापालिकेतील मंजूर असलेल्या कर्मचारी आकृतीबंधाचे अध्ययन करून तातडीने रिक्त पदे भरून त्यात अनुकंपाधारकांना प्राधान्य द्यावे असे पत्र महापालिका प्रशासनाला पाठविले आहे.
यामुळे अभिषेक पाटील यांच्या पुढाकारामुळे आता अनुकंपाधारकांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.