Home Cities चाळीसगाव उंबरखेड ग्रामस्थांसह तरूणांशी देवकरांनी साधला संवाद

उंबरखेड ग्रामस्थांसह तरूणांशी देवकरांनी साधला संवाद


umbarkheda

उबरखेड ता.चाळीसगाव । उबरखेड येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावातील पदाधिकारी, ग्रामस्थांशी व युवावर्गाशी जळगाव लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी सवांद साधला. यानंतर चौकांतच ग्रामंस्थांसोबत सवांद साधत परिवर्तन करत राष्ट्रवादी आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. संधी दिल्यास निश्चितच सिंचनासह इतर विविध विकास कामांना गती मिळेल. यावर सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले. माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी देखिल मनोगत व्यक्त करत परिवर्तनाचे आवाहन केले.

 

 

यांची होती उपस्थिती
यावेळी उबरखेडचे रविंद्र चुडामण पाटील, सरपंच केदारसिंग धर्मा पाटील, उदयसिंग मोहन पाटील, नितीन पाटील, मनोज धनराज पाटील , प्रकाश पाटील , रविंद्र सुकदेव पाटील, राजेंद्र केदारासिंग पाटील यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवंर व ग्रामस्थांनी एकदिलाने सहकार्य करण्याचे अश्वासन दिले. सोबत पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प. गटनेते शशिभाऊ साळुंखे, जि.प. सदस्य भूषण पाटील, डॉ.शहाजीराव देशमुख, मंगेश बापू पाटील, भगवान बापू पाटील, रामचंद्र जाधव, मिलिंद जाधव, कॉग्रेसचे नेते अशोक खलाणे, अनिल निकम, योगेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound