गोदावरी नर्सिंगमध्ये संवाद कौशल्य विकास व्याख्यान व चर्चासत्र !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग स्टुडंट वेलफेअर विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद कौशल्य विकास व्याख्यान व चर्चासत्र नुकतेच उत्साहात पार पडले.

मार्गदर्शन आणि चर्चा
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, रवींद्र बोरडे (जीटीटी फाउंडेशन, पुणे) यांनी नर्सिंग क्षेत्रातील संवाद कौशल्याचे महत्त्व, ध्येय ठरवणे, प्रभावी संवाद, वेळेचे व्यवस्थापन, आत्मप्रेरणा आणि नेतृत्वगुण यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी, प्रशिक्षक शेख यांनी लैंगिक छळ प्रतिबंध, टिकाऊ विचार, समस्यांचे समाधान, निर्णय क्षमता, वैद्यकीय नैतिकता आणि आरोग्यसेवेतील ग्राहक सेवा यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच प्रभावी बायोडाटा, ई-मेल शिष्टाचार, ऑनलाइन नोकरी अर्ज, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत कौशल्ये यावरही भर देण्यात आला.

उपक्रम आणि समारोप
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासाठी व्यावहारिक उपक्रम, भूमिकानाट्य आणि वास्तव जीवनातील प्रकरण अभ्यास याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप अनुभवांच्या आणि शिकवणीच्या चर्चासत्राने झाला. या चर्चासत्रातून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्ये आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली, जी त्यांच्या भावी जीवनात निश्चितच उपयुक्त ठरतील.

सहभाग आणि आयोजन
या कार्यक्रमात २५ नर्सिंग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्या विशाखा गणवीर, उपप्राचार्या जेसिंथ धया, प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. रश्मी टेंबुर्ने, प्रा. स्वाती गाडेगोणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पायल हांडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Protected Content