ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमीगत गटार व पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामास प्रारंभ

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा म्हणून धरणगाव येथे ना गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शहरातील जनतेला भूमिगत गटर पाणीपुरवठा वितरण व्यवस्था चे आश्वासन दिले होते ते प्रत्यक्षात सद्या करण्यासाठी ना गुलाबराव पाटील आढावा घेऊन धरणगाव शहरात भूमिगत गटर व पाईपलाईन चा सर्वेक्षण चा शुभारंभ करण्यात आला.

सदर काम लातूर येथील वैश्विक कन्सल्टन्सी चा माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे तसेच हा सर्व्हे धरणगाव शहारत नव्हे तर वाढीव हद्दी सहित प्रकल्पाच्या सविस्तर आव्हाल सदरणात १००कोटी पर्यंतचा आव्हाल मजुरी साठी शासन दरबारी पाठवून पाणीपुरवठा मंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या कडे सादर करण्यात येईल ना गुलाबराव पाटील खात्याचे मंत्री असल्याने याचा फायदा तर होईल परंतु निवडणूकित कालावधी ना गुलाबराव पाटील यांनी विकास कामाचा दिलेल्या आश्वासन पुर्तता होईल तसेचधरणगाव शहरातील पाणीपुरवठा सर्वेक्षण काम सुरू झाले. तसेच भूमिगत गटार योजनेसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येत आहे . राज्य सरकार चा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातर्फे ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी या योजनेच्या कामाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे. पालिकेचे विस्तारीत क्षेत्र १६३ चौरस किलोमीटर आहे. या संपूर्ण परिसरात ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी लातूर येथील कन्सलटंन्सीच्या दोन अभियंत्यांनी शहराची लोकसंख्या, भौगोलिक रचना आदींची माहिती घेतली. त्यावरून तयार आराखड्यानुसार संपूर्ण शहराचा ‘मायक्रो सर्व्हे’ केला जाणार आहे. त्याकरिता लातूर ची वैश्विक कन्सलटन्सीची संपूर्ण टीम धरणगावात आली आहे. योजनेच्या अंतिम सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. या योजनेसाठी शहरात सातही दिवस पाणीपुरवठा असणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा चा वितरण व्यवस्था चा प्रश्न सुटणार आहे.

अशी आहे योजना
163 किलोमीटर पाईपलाईन होणार, भूमिगत गटार अंदाजित रक्कम 30 कोटी, नवीन पाईपलाईन अंदाजित 40 कोटी,शहरातील ट्रीमिक्स रस्ते अंदाजे 30 कोटी,धरणी नाला सुशोभीकरण होणार ,सुसज्ज ४ पाणी टाकी याचा सविस्तर अवहाल तयार करुन शासन दरबारी मजुरी साठी पाठवणार असल्याची माहिती मुख्यधिकारी जनार्दन पवार व नगर अभियंता सुमित पाटील यांनी दिली.

याची होती उपस्थितिथी
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुख मा.गुलाबरावजी वाघ, जिल्हा उपप्रमुख पी एम पाटील सर नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी ,गटनेते पप्पू भावे,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे,विभाग प्रमुख संजय चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, विजय महाजन , अजय चव्हाण ,भागवत चौधरी, बापू पारेराव , नंदू पाटील, जितेंद्र धनगर, अहेमद पठाण शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव,अॅड.शरद माळी,धिरेंद्र पुरभे,तौसिफ पटेल,हेमंत चौधरी,चेतन जाधव,पापा वाघरे,विलास माळी, छोटू भाऊ जाधव, सतीश बोरसे , नारायण महाजन , कमलेश बोरसे,विनोद मराठे,दिपक पाटिल,महेंद्र चौधरी,गोपाल चौधरी,अरविंद चौधरी,अमोल चौधरी तसेच सर्व शिवसैनिक व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

वितरण व्यवस्था सुरळीत होणार
धरणगाव शहारात ना गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचा मार्गदर्शन खाली शहरात भूमिगत गटार व नवीन पाईपलाईन ची योजना आखली असून धरणगाव शहरात एकूण १२०झोन असल्यामुळे नागरिकान पर्यत पाणीपुरवठा कण्यासाठी १०ते १२दिवशी पाणी येत होते या योजनेमुळे शहरात दोन दिवसात पाणी पुरवठा करता येईल शहतील जनतेला विकासा कामाचा श्रेय ना गुलाबराव पाटील जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व सलिम पटेल यांना देतो

 

 

Protected Content