यावलच्या विस्तारित भागासाठी पाईप लाईनच्या कामास प्रारंभ

यावल प्रतिनिधी । यावल शहराच्या विस्तारीत भागासाठी पाईपलाईनच्या कामास रक्षाताई खडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यावल शहरातील विस्तारीत वसाहती मधील सुमारे २२ कॉलनी मध्ये स्वच्छ आणी मुबलक पाणीपुरवठा व्हावा या उद्धेशाने १० लक्ष लिटर पाणी साठवन क्षमता असलेल्या जलकुंभातुन ३ कोटी६५ लाख रुपये निधी खर्चातुन जलवाहिनी पाईपलाईनच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

येणार्‍या काळात आपण नगर परिषदच्या माध्यमातुन सुमारे १० कोटी रुपये निधीची विविध विकास कामांचे नियोजन हाती घेतले आहे. यानुसार नगराध्यक्ष श्रीमती नौशाद तडवी यांच्या कार्यकाळातील येत्या एक ते दीड वर्षाच्या कालावधीत ही सर्व विकास कामे पुर्णत्वास जातील आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण सुमारे २० कोटी रूपयांचे निधी मंजुर करून घेतली असुन या निधीच्या माध्यमातुन शहराचा चेहरामोहरा बदलु असा विश्‍वास माजी नगराध्यक्ष व नगर परिषद चे गटनेते अतुल पाटील यांनी व्यक्त केले.

या वेळी पक्षीय मतभेद बाजुला ठेवुन शहरातील विकास कामे करण्यासाठी आपण सर्व एकत्र येवुन कार्यकरीत आहे ही एक चांगली गोष्ट असल्याचे खासदार रक्षाताई खडसे यांनी सांगीतले. तर, आपल्या तालुक्याचे माजी आमदार दिवंगत हरिभाऊ जावळे यांची आठवण काढुन ते आपल्यात आज उपस्थित नाही याचे दु:ख त्यांनी या वेळी व्यक्त केले. तेव्हा कोरोनाच्या संसर्गाच्या बचावासाठी आपण सर्वानी शासन नियम पाळणे हे अत्यंत गरजे असल्याचे त्यांनी सांगीतले. या प्रसंगी त्यांच्या हस्ते आज सायंकाळी संपन्न झालेल्या विविध विकास कामांचे भुमीपुजनाचे व घनकचरा वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

यावल शहरातील विरार नगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदीरच्या सभामंडपात संपन्न झालेल्या नगर परिषदच्या विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रक्षाताई खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्ष श्रीमती नौशाद मुबारक तडवी, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल वसंत पाटील, माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष राकेरा मुरलीधर कोलते, नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश सुरेश गडे, नगरसेविका सौ. रेखा युवराज चौधरी, सौ. कल्पना दिलीप वाणी , रुख्माबाई भालेराव, नगरसेविका सौ. पौर्णिमा फालक, आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेशाध्यक्ष एम बी तडवी यांच्यासह आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांनी मांडली तर सुत्रसंचालन नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रमाकांत मोरे यांनी केले तर आभार नगरसेविका सौ. रेखा चौधरी यांनी मानले.

Protected Content