मुंढोळदे ते सुलवाडी तापी नदीवरील पुलांच्या कामास सुरूवात; आ.चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंढोळदे (खडकाचे) ता.मुक्ताईनगर ते सुलवाडी ता. रावेर या दरम्यान तापी नदीवरपूल उभारण्याचा मुद्दा आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेचा केला होता. ४ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन ही पार पडले होते. आता विधानसभा आचार संहिता लागण्यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजी या पुलासाठी ९७ कोटी ५९ लाख ११ हजार रुपये इतका निधी उपलब्ध करण्यात आल आहे. पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आ.चंद्रकांत पाटील यांनी विकास कामात एखादे मोठे पूल करून दाखवावे मी त्यांचा जाहीर सत्कार करेल अशी घोषणा आ. एकनाथराव खडसे यांनी या पूर्वी केली होती. अशात नुकतेच मुंढोदे (खडकाचे) ते सुलवाडी ता. रावेर या दरम्यान तापी नदीवर पूल उभारण्या बाबत प्रत्यक्ष वर्क ऑर्डर निघाली आहे.

तब्बल १०२ कोटी २१ लाख रुपये अपसेट मूल्य असलेल्या या पुलाची २२ फेब्रुवारी रोजी निविदा प्रसिध्द झाली होती. २८ मार्च रोजी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा प्रक्रियेतील अंती ९७ कोटी ५९ लाख ११ हजार खर्चातून मुंढोळदे ता.मुक्ताईनगर व सुलवाडी ता.रावेर दरम्यान तापी नदी वर पूल उभारण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव मार्फत वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे.

भुसावळ येथिल बी एन ए इन्फ्रा कंपनीला हे काम मिळाले आहे. बहू प्रतिष्ठित प्रत्यक्ष वर्क ऑर्डर निघाल्याने पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. तापी, पूर्णा नदीवरील पुलांच्या तोडीस तोड असलेला हा तापी नदीवरील पूल आकारात येणार आहे. मुंढोळदे ता.मुक्ताईनगर व सुलवाडी ता.रावेर दरम्यान हा पूल उभारला जाणार असून 102 कोटी 21 लाख रुपयातून पूल उभारणी तर 73 कोटी रुपये खर्चातून मुंढोळदे ते पूल आणि रावेर तालुक्यात पुलापासून सुलवाडी व ऐनपूर असा रस्ता करण्यात येणार आहे. एकूण 175 कोटी रुपये खर्चातून पूल व जोड रस्ते होणार आहेत. या पुलामुळे उचंदे परिसर अगदी कमी अंतरात रावेर तालुक्याशी जोडला जाणार आहे.

Protected Content