Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही रुग्ण नाही

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही रुग्ण नाही

0
24

जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound