मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी राणे पिता पुत्रांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल होताच राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
दिशा सालियन यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यू संदर्भात ती आत्महत्या नसून खून झाल्याचं तसेच तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परीषदेत जाहीररित्या सांगितलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या दिशा सालियन यांच्या पालकांनी आधी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच धिंडोशी कोर्टात आज या प्रकरणी सुनावणी पार पडली.