राष्ट्रवादी पक्षासह आ. एकनाथराव खडसे यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे आणि पक्षाची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनुसार फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शिवमुद्रा या व्हाट्सअप ग्रुप वरती मृत्युंजय नामक व्यक्तीने नाथाभाऊंवर अगदी गलिच्छ खोटे आरोप करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटीक यांनी दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत फैजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटीक, राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुका संघटक राहुल चौधरी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे, अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष शाकीर शेख, युवा कार्यकर्ता वसिम जनाब, मुद्दसर जनाब, सामाजिक न्याय विभाग प्रकाश पारधे, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे तालुका उपाध्यक्ष सरदार तडवी यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content