धनगर समाजाच्या उपोषणस्थळी आ. एकनाथ खडसेंनी दिली भेट

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून अंमलबजावणी करण्यासाठी समाजाचे सहा नेते आमरण उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सलग चौथ्या दिवशीही पहूर बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी धनगर समाज जामनेर तालुकाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. आज साखळी उपोषणाचा चौथा दिवस असून आज धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, शांताराम गोंदनखेडे, अमोल अरुण पाटील हे तीन जण उपोषणास बसले आहे.

आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या साखळी उपोषणास भेट देऊन नेहमी संकटामध्ये धावून जाणारे संकट मोचक आता कुठे गेले असा संतप्त सवाल यावेळी एकनाथराव खडसे यांनी बोलून दाखवत धनगर बांधवांना विनंती करतो की यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे असेही एकनाथराव खडसे यांनी साखळी उपोषणाच्या भेटी प्रसंगी मत व्यक्त केले.यावेळी पहूर सह परिसरातील सर्व सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content