जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवनीत राणा यांना “माझ्या वार्डात निवडून येऊन दाखवा !” असं खुलं आव्हान जळगाव येथील शिवसेना नगरसेवक नितीन बरडे यांनी केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमुळे चर्चांना रंगत आली आहे.
जळगाव येथील शिवसेना नगरसेवक नितीन बरडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली असून त्यात “माननीय उद्धव साहेब यांना काय आव्हान देतात ती तुमची पात्रता नाही” असं म्हणत “माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना पराभूत करून दाखवा. या माझ्या वार्डात आणि मला पराभूत करून दाखवा.” असं आव्हान केलं आहे.
पुढे पोस्टमध्ये “कुठे उद्धव साहेब आणि कुठे तुम्ही” असं म्हणत बरडे यांनी
“आभाळावरती थुंकती कळप छाकटे;
त्यांच्या थुंकण्याने का होईल आभाळ धाकटे..”
असा टोला लगावत “नवनीत राणा तुम्हाला तुमची जागा दाखवायला मी पुरेसा आहे” असं म्हणत जळगाव महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ येथील शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी नवनीत राणा यांना निवडणुकीसाठी खुलं आव्हान दिलं आहे