पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र.अ. येथील स्व.योगेश विश्वास देवरे हे पंचायत समिती, पारोळा अंतर्गत मोंढाळे प्र.अ. ग्रामपंचायतीत कर्तव्यात होते. ते कर्तव्यात असतांना कोव्हीड-१९ संसर्गामुळे त्यांचा १३ एप्रिल, २०२१ रोजी मृत्यू झाला. त्यांचे असे अचानक निघून जाण्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अशात स्व.देवरे यांच्या वारसांनी विमा कवच रक्कम मिळणेसाठी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेतली होती.
त्याची आमदार चिमणराव पाटील यांनी दखल घेत तातडीने स्व.देवरे यांना विमा कवच रक्कम मिळवण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयाला प्रस्ताव तयार करून शासन दरबारी दाखल करण्याचा सुचना केल्या होत्या. त्यानंतर या प्रस्तावाचा आमदार चिमणराव पाटील यांनी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा केल्याने स्व.देवरे यांच्या वारसांना ५० लक्ष रूपये विमा कवच रक्कम मंजुर झाली. या मंजुरीचा आदेश आज आमदार चिमणराव पाटील, शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या शुभहस्ते स्व.देवरे यांचे वारस पत्नी श्रीमती.सुरेखा योगेश देवरे यांना सुपुर्द करण्यात आला.