आषाढी एकादशीनिमित्त आ. शिरीष चौधरींचे विठू माऊलीला साकडे !

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे येथे आज यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रसिद्ध वारकरी सेवेकरी कै.जगन्नाथ महाराज यांच्या तिर्थक्षेत्र मंदिरात जावुन परमेश्वरा कोरोनामुक्त आणि पाऊस पडू दे असे विठूरायाला साकडे घातले आहे.

यावल तालुक्यातील अंजाळे गावातील संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध विठुमावली वारकरी संप्रदायाचे सेवेकरी कै .जगन्नाथ महाराज यांच्या मंदीरास भेट देवुन विठु मावलीचे  दर्शन घेतले यावेळी महाराष्ट्र राज्याला कोरोना संसर्गा संकटा पासुन मुक्ती आणी परिसरात वरूणराजा रूसल्याने झालेल्या आतापर्यंतच्या अत्यल्प पावसामुळे दुबार पेरणीच्या संकटाळ सापडलेल्या बळीराजा शेतकरी बांधवांच्या पिक सरक्षणासाठी पाऊस पडण्यासाठी आज आषाढी एकादशीचे औचित्य साधुन प्रार्थना करून ईश्वराला साकडे घातले.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदचे गटनेते तथा कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल पंचायत सामितीचे गटनेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील , अंजाळे गावाचे उपसरपंच दिपक चौधरी , यशवंत सपकाळे , गिरधर चौधरी , कोळवदचे सामाजीक कार्यकर्ते धिरज कुरकुरे , मंदीराचे सेवक शालीक महाराज , व धनराज महाजन आदी कार्यकर्ते व पदधिकारी त्यांच्या सोबत होते .

 

Protected Content