पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुटुंब प्रमुख मयत झालेल्या निराधार विधवा माता-भगिनींना मदतीचा हात तसेच कुटुंबाला आधार व्हावा म्हणून राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत दाखल केलेले प्रस्ताव आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तहसीलदारांच्या दालनात घेतलेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण ३५ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचे धनादेशाचे वाटप आमदार किशोरआप्पा पाटील यांचे हस्ते आज करण्यात आले.
यावेळी ऍड.दिनकर देवरे, रावसाहेब पाटील (जी.प.सदस्य), गणेश पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमुख),पदमसिंग राजपूत (जी.प.सदस्य),राजेश पाटील,कैलास चावडे (तहसीलदार),अमित भोईटे (नायब तहसीलदार), बी.पी.नेटके, रेखा साळुंखे, एस.पी.पाटील,नाना वाघ,अजय देवरे,अजय जैस्वाल,सुभाष तावडे,रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
लाभार्थी पुढीलप्रमाणे
कमलबाई अशोक सोनवणे (पिंपळगाव बुद्रुक), अनिता भगवान पाटील (सांगवी), सीताबाई संतोष भालेराव (खेडगाव न), कावेरीबाई रंगलाल पवार (पिंपळगाव बु), कमलबाई नंदकिशोर पाटील (सांगवी प्र. लो), मंगलबाई जंगलू सोनवणे (नगरदेवळा), अलकाबाई प्रमोद पवार (नगरदेवळा), मालती रमेश जाधव (पिंपळगाव बु), यशोदा युवराज मालकर (पिंपळगाव बु), शकुंतला भिका सावळे (पिंपळगाव बु), ज्योती अर्जुन धनगर (पिंपळगाव बु), लिलाबाई एकनाथ (मांग कुरंगी), अक्काबाई अरुण शिरसाट (पाचोरा), कल्याणी विशाल पाटील (सारवे बु प्र पा), निर्मला साधू पवार (वडगाव आंबे), सुनीताबाई मानसिंग राठोड (वरसाडे प्र पा), लहानाबाई दादा भाऊ सोनवणे (होळ), सायराबाई रशीद काकर (लोहारी बु) , प्रमिला राजाराम शेवरे (पाचोरा), ताराबाई गौतम मोरे (तारखेडा बु), भिकुबाई भुरा कोळी (खाजोळा), संगीताबाई रमेश वडर (शिंदाड), ज्योती अशोक भाई (पिंपळगाव बु) , उषाबाई ज्ञानेश्वर कोळी (दहिगाव संत), कल्पनाबाई रमेश बाविस्कर (वाणेगाव) , सुनिता दगडू न्हावी (नाचणखेडा), गौरव संजय तेली (खडकदेवळा खू) ,मुमताज हरून शहा (खडकदेवळा खू), वैशाली दिलीप भिल (आसनखेडा), प्रतिभा जीभाऊ पाटील (वेरुळी), भारत प्रताप नाईक (नगरदेवळा), लताबाई कारभारी पाटील (मोंढाळे), संभाजी सुकलाल पाटील (वडगाव टेक) आदींना धनादेश वाटप करण्यात आले.