पाचोरा प्रतिनिधी । आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा पाचोरातर्फे जाहिर निषेध करत एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. तसेच आ.शिरसाठ यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पोलिस निरीक्षक, पाचोरा, तहसिलदार कैलास चावडे व पंचायत समितीचे कक्षा अधिकारी पी. एम. टेकाडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे व सुनिल पाटील उपस्थित होते. औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे आमदार संजय शिरसाठ यांनी दि. ०८ रोजी औरंगाबाद येथे सरपंचांचे प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करतांना, शासकिय व्यासपीठावरुन ग्रामसेवक संवर्गाबद्दल “भामटा, हरामखोर ” अशी अपशब्द वापरुन संवर्गाची बदनामी केली तसेच, ग्रामविकासात सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्तीक जबाबदारीचे भान न ठेवता दोघांमध्ये कसा तेढ निर्माण होईल ? अशा दृष्टीने, ग्रामसेवक तुमचा नौकर आहे, तो तुमच्या हाताखाली काम करतो, त्याचे ऐकु नका, असे वेजबाबदार विधान करुन दोन ग्रुपमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले व चिथावणी खोर भाषण करुन संपुर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश देवुन ग्रामसेवक संवर्गाविषयी अविश्वासाचे वातावरण तयार केले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामसेवक संवर्ग प्रचंड तणावात येवुन, संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
आमदार संजय शिरसाठ यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा, संपुर्ण महाराष्ट्रात दि. ९ रोजी निषेध नोंदवत असलेला निषेध व एक दिवस कामबंद आंदोलनाचे रुपांतर मोठ्या आंदोलनात होईल अशा आषयाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार गोराडे, उपाध्यक्ष के. डी. गोसावी, सचिव सतिष सत्रे सह विकास पाटील, व्ही. पी. पाटील, सुनिल पाटील, अविनाश पाटील, शरद पाटील, नारायण सोनवणे, डी. एन. मोरे, एन. जी. पाटील, ए. एफ. पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील, प्रमोद जगताप, व्ही. टी. पाटील, ए. एस. राठोड, एम. जी. सुर्यवंशी, नितीन बोरसे, एस. के. तडवी सह मोठ्या संख्येने ग्रामसेवक उपस्थित होते.
फेसबुक व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1249736112170351