आ. चिमणआबा पाटलांच्या प्रयत्नांनी पारोळा शहरात २०० कोटींपेक्षा जास्त निधींची विकासकामे !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चिमणआबा पाटील यांचे प्रयत्न व अमोलदादा पाटील यांच्या पाठपुराव्याने पारोळा शहरात तब्बल 200 कोटींपेक्षा जास्त निधीतून कामे करण्यात आली असून याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

शहरात आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक प्रयतांत्ुान व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून पारोळा शहराचा वैभवात मोठी भर घालणाऱ्या 200 हुन अधिक कोटींचा कामांना मंजुरी मिळाली आहे. ही काम नुसती कागदावरच नाही तर आज ही कामे प्रत्यक्ष पुर्ण होत आहेत.यात शहरासाठी ज्वलंत व जिव्हाळ्याची असलेली पाणी पुरवठा योजना, जलतरण तलाव, क्रिडा संकुल, राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर, भारतरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसर, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा व परिसर, आझाद चौकाचे सुशोभिकरण, संत श्री तुकाराम महाराज चौकाचे सुशोभिकरण, मोठा महादेव चौकाचे सुशोभिकरण, पाठीच्या माथा (धरणगांव चौफुली) सुशोभिकरण, शहरात विद्युतीकरण यांसह अनेक कामांचा समावेश आहे.

घटस्थापनेच्या शुभमुहुर्तावर पारोळा शहरात प्रवेश करणारे कजगांव नाका ते नगरपरिषद हद्द, भडगांव नाका ते नगरपरिषद हद्द, उंदिरखेडे नाका ते नगरपरिषद हद्द, अमळनेर नाका ते नगरपरिषद हद्द, कासोदा नाका त्ो नगरपरिषद हद्द, धरणगांव चौफुली (पाटील माथा) ते नगरपरिषद हद्द, धरणगांव चौफुली (पाटील माथा) त्ो आझाद चौक, जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.6, पीर दरवाजा ते जुलुमपुरा श्रीराम मंदीर, भवानी चौक ते धरणगांव रोड या मुख्य रस्त्यावर विद्युतीकरण, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसर सुशोभिकरण करणे, नाभिक समाज बांधवांसाठी सामाजिक सभागृह बांधकाम करणे, धरणगांव चौफुली ( पाठीच्या माथा) सुशोभिकरण करणे या एकुण 07.60 कोटी रूपयांचा विकासकामांचे आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते व अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

या विकासकामांतुन शहराचा वैभवात मोठी भर पडणार आहे.शहरात प्रवेश करणारे मुख्य रस्ते यापुर्वी पुर्ण काळोख्यात होते. शहरात इतर ठिकाणांहुन प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. शहरातील दैनंदिन पायी फिरणाऱ्या शहरवासियांना रात्रीच्या काळोख्यात या रस्त्यांना घरा बाहेर पडणे जिकरीचे होत होत्ो. परंत्ुा आता या प्रकाशयम वातावरणात सर्वांची कायमची चिंता या विद्युतीकरणामुळे मार्गी लागली आहे. यासह या मुख्य रस्त्यावरील प्रकाशमय वातावरण हे शहराचा वैभवात मोठी भर घालत आहे.पारोळा शहराची मुळ ओळख ही झाशीच्या राणीचे माहेरघर म्हणुन सर्वश्रूत आहे. शहरात गेल्या अनेक दशकांपासुन झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा देखील आहे. ह्या पुतळा सभोवतालील परिसर हा घाणीच्या साम्राज्याने दुरावस्थेत होता. आजवर अनेकांनी फक्त हार घालुन तोंडाच्या वाफाचं केल्या होत्या. परंतु या परिसराची आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांनी दखल घेत या परिसराचा सुशोभिकरणासाठी २५ लक्ष रुपयांचा निधीला मंजुरी मिळवुन आणली. हे काम आज पुर्णत्वास आले असुन या विकासकामामुळे या परिसराला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. सभोवतालील बांधकाम, प्रतिमा व विद्युत रोषणाईने हा परिसर अतिशय आकर्षक शोभुन दिसत आहे.

पारोळा शहरात नाभिक समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे, शहारातील लहान-मोठ्या समाजांना न्याय देण्याची ही आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांची पुर्वीपासुनच आहे. नाभिक समाज बांधवांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार चिमणराव पाटील व अमोलदादा पाटील यांनी ३५ लक्ष रूपये मंजुर करून सामाजिक सभागृह उभारून देण्यात आले.पारोळा शहरात प्रवेश करणार पाठीच्या माथा (धरणगांव चौफुली) हा मुख्य केंद्रबिंदु मानला जातो. शहरालगत असलेला जुना राष्ट्रीय महामार्ग व नविन महामार्गाकडुन येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणाहुनच शहरात प्रवेश करावा लागतो. पारोळा शहर प्रतितिरूपती श्री बालाजी महाराजांची पावन नगरी म्हणुन ओळखली जाते. शहरातून दैनंदिन असंख्य नागरिक हे या धरणगांव चौफुली ( पार्टीच्या माथा) येथे आपला व्यवसाय, पायी फिरण्यासाठी येत असतात. तसेच राष्ट्रीय महामार्गाकडुन दैनंदिन प्रवास करर्ण़ाया नागरिकांना देखील हा चौक स्पष्टपणे दिसत असतो. आपल्या शहराची प्रतितिरूपती ही ओळख प्रवेश करतांना बाहेरगावाहुन आलेल्या नागरिकांना व्हावी यासाठी याठिकाणी श्री बालाजी महाराज्यांचा शंख चक्र तिलकाची प्रतिकृति साकारण्यात आली आहे. यावेळी या शहराचा कायापालटाला आजपासुन सुरूवात झाली असुन येत्या काळात सर्वच सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे माझे प्रयत सुरूच राहणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. तर हे पारोळा शहर बदलतयं ह्या आमच्या दुरदृष्टीला आज खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे.

शहरात लोकार्पण झालेली कामे ही नक्कीच शहराचा वैभवात भर घालणार असल्याचे आपण अनुभवत असालचं, यानंतर शहराला पाणीपुरवठा कसा लवकरात लवकर कमी दिवसांवर आणता येईल यासाठी आमचे प्रयत असणार आहेत, हे शहर तुम्ही बघितलेल स्वप्नातल शहर साकारण्याचा आमचा मानस असल्याचे अमोलदादा पाटील यांनी सांगितले.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे संचालक चत्ुार पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, शेतकी संघाचे माजी उपाध्यक्ष सखानाना चौधरी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शेतकी संघाचे संचालक साहेबराव पाटील, माजी नगरसेवक भिमराव जावळे, राजु कासार, माजी शहरप्रमुख बापु मिस्तरी, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, युवासेना शहरप्रमुख अमोल मराठे, मुंदाणे प्र.ऊ.सरपंच एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे, उंदिरखेडे ग्रामपंचायत सदस्य अक्षय निकम, पारोळा शहरातील रमेश चौधरी साहेब, कैलास पाटील, योगेश पाटील, दिनेश पाटील, अमोल चौधरी, नाना मराठे सर, विशाल राजपुत सर, सतिष महाजन सर, ईश्वर धोबी सर, आबा मराठे, पंकज मराठे, बापु मराठे, कल्पेश जाधव, अस्लम खाटीक, राजु पाटील, सुनिल निकम, दिग्विजय देवरे, उपशहरप्रमुख नितीन बारी, मन्साराम चौधरी, बांधकाम व्यावसायिक विलास वाघ, पी.आर. वाणी, विनोद पाटील, राजु पाटील, संजय गोसावी सर, कोमल पाटील, मयुर भोई, बंटी पाटील, वैभव चौधरी, अजय पाटील, भैय्या ठाकरे, सुजित पाटील, विजय पाटील, तेजु नरवाळे, चंद्रकांत पाटील, जय पाटील, भुषण सोनार, श्रीराम मोरे, निलेश मराठे, कल्पेश मराठे, वाघरे येथील गणेश पाटील, विनायक चौधरी, कैलास चौधरी, गुलशन शेख, ईस्माईल मिर्झा, पप्पु शाह यांचेसह नाभिक समाज पंचमंडळ, समाजबांधव व शहरवासिय उपस्थित होते.

Protected Content