मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने तालुक्यातील चारही महसूल मंडळांच्या अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
बुधवारी दि.९ ऑगस्ट रोजी पी एम किसान सन्मान योजना व राज्य शासनाची नमो किसान सन्मान योजनेची आढावा बैठक आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती. यात या योजनांपासून वंचित राहिलेले लाभार्थी,लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रुटी व अपूर्ण राहिलेले इकेवायसी पूर्ण करण्या संदर्भात तालुक्यात मंडळ निहाय शिबिरे आयोजित करून सर्व लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ तात्काळ मिळण्यासंदर्भात त्यांनी सूचना केली होती.
आमदार पाटील यांच्या सुचनेनुसार गुरुवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या आदेशाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतूर्ली , कुर्हा, घोडसगाव व मुक्ताईनगर या चारही मंडळे अंतर्गत शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. या वीराच्या माध्यमातून कुर्हा -६२०, घोडसगाव – ५१०, अंतुर्ली – २७२ व मुक्ताईनगर – १९८ असे एकूण सुमारे १६०० च्या जवळपास शेतकर्यांनी लाभ घेतला.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी कुर्हा येथे सुरू असलेल्या शिबिरांला भेट दिली प्रसंगी भाजपा उपप्रदेशाध्यक्ष अशोक कांडेलकर, नवनीत पाटील,पंकज पांडव,सतीश नागरे, अनंत पाटील,रणजित गोयनका,अविनाश वाढे, अकबर ठेकेदार,अशोक गरड, भागवत सोनवणे,नारायण पाटील,दीपक वाघ,विष्णू इंगळे,विष्णू पाटील,गणेश सोनवणे,इम्रान खान,कुर्बान खान तसेच आमदारांनी अंतुर्ली येथे देखील भेट दिली असता सरपंच शिरतुरे, मोहन बेलदार, भागवत कोळी , डी. आर. महाजन यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.