आ. अनिल पाटील यांची घोड्यावर मिरवणूक काढून सत्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विधानसभा मतदासंघात सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल तालुक्यातील धार येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा नवनिर्वाचित आमदार अनिल भाईदास पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

सुरवातीला आमदार पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी धारचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कै.एच एस पाटील यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले.यानंतर भवानी मंदिराच्या परिसरात त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.यावेळी आमदार पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सत्काराला उत्तर दिले.

कार्यक्रमास प्र. डांगरीचे माजी सरपंच अनिल सिसोदे, सुरेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शिवाजी पाटील, सोनू पाटील धारचे माजी सरपंच गणेश धोंडू पाटील, यशवंत धोंडू पाटील, यशवंत शंकर पाटील, संजय पाटील, संजय शेनवडू पाटील, मगन बाबुराव पाटील, शशिकांत सखाराम पाटील, बुदागीर गोसावी,बाबू पेंटर, प्रा. गणेश पवार, उमाकांत साळुंखे, यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्निल पाटील यांनी व आभार प्रदर्शन अलीम मुजावर यांनी केले.

Protected Content