Home Cities धरणगाव धरणगावात पहाटे ‘कोम्बिंग ऑपरेशन’; रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून तपासणी

धरणगावात पहाटे ‘कोम्बिंग ऑपरेशन’; रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून तपासणी

0
173

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. हे ऑपरेशन पहाटे ४:३० ते ६:३० वाजेदरम्यान करण्यात आले.

या कारवाईत ४ पोलीस अधिकारी आणि १६ अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान, धरणगाव पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर, दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या घरांची अचानक तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान करतारसिंग गुरुमुखसिंग जुन्नी नावाचा तडीपार आरोपी पोलिसांना मिळून आला. तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ नुसार कडक कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार आणि आरोपींना बोलावून घेतले आणि त्यांना सोशल मीडियाचा गैरवापर तसेच शांततेचा भंग करण्यासंबंधी कडक सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound