Home क्राईम सहकाऱ्याने झाडल्या गोळ्या ; ३ सीआरपीएफ जवान ठार

सहकाऱ्याने झाडल्या गोळ्या ; ३ सीआरपीएफ जवान ठार


जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीर येथील सीआरपीएफ कॅम्पमधील एका जवानाने आपल्या तीन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या आहेत. यात तिघांचाही मृत्यू झाला असून उधमपूरच्या बट्टल बलियान परिसरात सीआरपीएफच्या १८७ बटालियनच्या कॅम्पमध्ये बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

 

सीआरपीएफचा कॉन्स्टेबल अजित कुमार याने सर्व्हिस रायफलमधून गोळीबार केला. यात राजस्थान येथील हेड कॉन्स्टेबल आर. पोकरमाल, दिल्लीतील योगेंद्र शर्मा आणि हरयाणातील उमेद सिंह हे तिघेजण जागीच ठार झाले. त्यानंतर अजित कुमारने स्वतःवरही गोळी झाडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली. गोळीबार करणारा अजित कुमार हा उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. कॅम्पमध्ये या जवानांमध्ये वाद झाला. त्यानंतर अजित कुमारने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound