जळगावात बकरी ईदनिमित्त सामूहिक नमाज

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद – उल – अजहा निमित्त दर सालाबाद प्रमाणे यंदाही शहरातील सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे नमाज – ए – ईद – उल अजहाचे १७ जून सोमवार रोजी ठीक सकाळी ०८:३० वाजता सुन्नी ईदगाह मैदान ,नियाज अली नगर ,सुप्रीम कॉलनी जळगाव या ठिकाणी मौलाना जाबिर रझा अमजदी यांच्या नेतृत्वात अदा करण्यात आली.

सर्वप्रथम सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी ट्रस्टच्या केलेल्या व भविष्यात केल्या जाणाऱ्या कामांविषयी माहिती देउन ट्रस्टच्या हिशोब सादर केला. तसेच आपण सर्वांनी आनंदात , उत्साहात ईद साजरी करताना अन्य धर्मियांच्या कोणत्याही प्रकारे धार्मिक भावना दुखावू नये, स्वच्छतेचे कडे पूर्ण लक्ष द्यावे, कायद्याच्या चौकटीतच राहून सण साजरे करावे, देश व देश बांधवांप्रती प्रामाणिकपणे राहून देशाच्या विकासाला हातभार लावावा तसेच ईद च्या नमाज साठी जळगाव पोलीस दल, जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांचे त्यांनी केलेल्या मदती साठी आभार मानले. मौलाना अलीम रजा यांनी सलातो सलाम म्हटले. मौलाना नजमुल हक यांनी तरीकाए नमाज (नमाज पठनाची पद्धत) सांगितली. यंदा ईदगाहवर पेवर ब्लॉक लावण्यासाठी चंदा (वर्गणी) जमा करण्यात आली. याप्रसंगी ” ए अल्लाह हमसफर अपना रहम करम फरमां, हमारे अजीम मुल्क भारत की और तमाम भारत मे रहने वालो की जान, माल ,इज्जत, आब्रू की हिफाजत फरमा, हमारे मुल्क में अम्न अमान कायम करदे, बेरोजगारो को रोजगार अता फरमा, पुरे मुल्क में अच्छी बारिश करदे “अशी दुवा (प्रार्थना) करण्यात येऊन उपस्थित नमाजी बांधवांनी त्याला आमिन म्हणत दाद दिली.

याप्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा अमजदि, मौलाना नजमुल हक मिसबाही, इकबाल वजीर, मुक्तार शहा, मौलाना अलीम रजा, मौलाना साबीर रजा , उमर खान, सय्यद सगीर, अफजल मणियार, कादर टिक्की, अश्रफ खान ई. सह दहा हजार समाज बांधव ईदगाह मैदानावर नमाज साठी उपस्थित होते.

Protected Content