कै. भगवान चौधरी यांच्या स्मरणार्थ शवपेटी भेट

shavpeti lokarpan

अमळनेर प्रतिनिधी । कै. भगवान चौधरी यांच्या स्मरणार्थ निंब गावाला त्यांच्या धर्मपत्नी गं.भा.विमलबाई भगवान चौधरी यांनी शव पेटी भेट दिली असून याचा लोकार्पण सोहळा छोटेखानी कार्यक्रमात पार पडला.

ग.भा.विमलबाई चौधरी यांच्या हस्ते व कपिलेश्‍वर देवस्थानचे मठाधिपती स्वामी हंसानंद महाराज यांच्या उपस्थितीत शवपेटी गावाला समर्पित करण्यात आली. याप्रसंगी निंबचे सरपंच भास्कर हिरामण चौधरी, वि.का.सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य अरुण लोटन पाटील, ज्ञानेश्‍वर ओंकार पाटील, नारायण कोळी, मधुकर रामदास चौधरी, डॉ.लादू दौलत चौधरी मंगल हिरामण पाटील,तुकाराम धोंडू चौधरी, सुभाष हिरामण चौधरी, लोटन नारायण पाटील,मगन वामन पाटील, दत्तात्रय सदाशिव पाटील, कैलास रामसिंग चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी कै. भगवान चौधरी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बळीराम रामकृष्ण चौधरी, ईश्‍वर भगवान चौधरी, मुख्याध्यापक अनिल भगवान चौधरी, सरकारी वकील अ‍ॅड.राजेंद्र भगवान चौधरी, नंदादीप माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content