नवीदिल्ली (वृत्तसंस्था) बॉलीवूड मधील अनेक कलाकार व गायक मनाप्रमाणे पैसे घेऊन आपल्या सोशल मीडिया अकौंटवरून कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यास तयार असल्याचा खळबळजनक प्रकार एका वेबसाईटने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाला आहे. यात अनेक कलाकार आपल्या मनासारखी रक्कम मिळाल्यास असा प्रचार करण्यास एका पायावर तयार होते.
या कलाकारांमध्ये गायक अभिजित भट्टाचार्य, कैलाश खेर, मिका सिंग, बाबा सहगल, अभिनेते जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेराय, सोनू सूद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, राखी सावंत, सनी लिओन, अमन वर्मा, राजू श्रीवास्तव, राजपाल यादव, पुनीत इस्सार, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकीतीन धीर, टिस्का चोपडा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट्ट, सलीम जैदी, हितेश तेजवानी, गौरी प्रधान, लवलीन शर्मा, मिनिषा लांबा, कोईना मित्रा, पूनम पांडे, उपासना सिंग, कृष्णा अभिषेक, गणेश आचार्य व संभावना पटेल यांचा समावेश आहे. त्याचवेळी विद्या बालन, अर्षद वारसी, रझा मुराद, सौम्या टंडन यांनी मात्र असे काही करण्याला स्पष्ट नकार दिला, असे या वेबसाईटने म्हटले आहे.