पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील बडगुजर समाजाच्या महासंमेलासाठी येत आहेत.
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे कालपासून बडगुजर समाजाचे महाअधिवेशन सुरू झाले आहे. याचा समारोप आज दुपारी होत असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत. आज सकाळी त्यांच्या दौर्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. एम.एम. कॉलेजच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर दुपारी तीन वाजता उतरणार आहे.
दरम्यान, एम.एम. कॉलेजमध्येच आज विद्यापीठ प्राधिकरणासाठी मतदान होत असून याच परिसरात हेलीपॅडची तयारी करण्यासाठी प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून येत आहे.