मुंबई प्रतिनिधी । पुण्यातील कोंढवा परिसरात झालेल्या दुर्घटनेची कसून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पुण्यातील कोंढवा भागात असणार्या आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत ही बाजूस असणार्या मजुरांच्या झोपड्यांवर कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतांप्रती संवेदना प्रकट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांच्यासह अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी चौकशीचे संकेत दिले आहेत. तर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील हे लवकरच घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.