Home Cities बोदवड बोदवड तालुक्यात स्वच्छता, वृक्षारोपण व प्रबोधन उपक्रम उत्साहात

बोदवड तालुक्यात स्वच्छता, वृक्षारोपण व प्रबोधन उपक्रम उत्साहात

0
247

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बोदवड तालुक्याच्या वतीने विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. “सेवा पंधरवाडा” अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान देशभर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या श्रेणीत हे कार्यक्रम पार पडले. या उपक्रमात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रमांचा समावेश होता.

बोदवड शहरातील बस स्टँड परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर शहरातील तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. चिखली-शेवगा येथे वृक्षारोपणासोबतच लोकशिक्षणात्मक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण रक्षणाची गरज आणि समाजासाठी आपले कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय नाळगाव, निमखेडी आणि धोंदखेडा या गावांमध्येही स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आले.

या संपूर्ण अभियानाचे संयोजन पंकजजी डीके यांनी केले. मयूरजी पाटील, सचिनजी जोशी हे सहसंयोजक होते. तालुकाध्यक्ष अमोलभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. मोदीजींचा वाढदिवस सेवा कार्याच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

या उपक्रमात तालुकाध्यक्ष अमोलजी देशमुख, राज्य परिषद सदस्य मधुकरभाऊ राणे, जिल्हा उपाध्यक्ष विजयभाऊ बडगुजर, जिल्हा सदस्य संतोष चौधरी, विक्रमसिंग पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस परमेश्वर टिकारे, तालुका उपाध्यक्ष उमेश पाटील, सौ. आशाताई सुधीर पाटील, अश्विनीताई भंगाळे, पुंडलिक पाटील, संजय अग्रवाल, राजेंद्र डापसे, विजय चौधरी, मुरलीधर जंजाळ, धनराज सुतार, विजय पालवे, बिहारीलाल आहुजा, नरेश आहुजा, राम आहुजा, राहुल माळी, जनार्दन चौधरी, मोहनजी देठे, सुधीर पाटील, जमीरोद्दीन मुसलमान, बशीरजी कंडक्टर, नामदेव सुशीर, मधुकर पारधी, विशाल तांगडे, जीवन माळी, गुणवंतराव गलवाडे, प्रशांत पाटील, दीपक जवरे, उमेश राजपूत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound