Home Cities जळगाव स्वच्छ भारत अभियानांतर्गत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे स्वच्छता उपक्रम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे स्वच्छता उपक्रम


जळगाव : येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे स्वच्छ भारत अभियान निमित्त स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे करण्यात आले होते.

या स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयातील विद्यार्थी व अध्यापक वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. परिसरातील विविध भागांत स्वच्छता करून सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिले. बी.एस्सी. नर्सिंगच्या तिसर्या सत्रातील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताच्या संकल्पनेला प्रेरणा मानून स्वच्छतेची शपथ घेतली.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करून, रोगप्रतिबंधक उपाययोजना व सामुदायिक आरोग्य यांचे भान निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राबविण्यात आलेली ही मोहीम स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना अधोरेखित करणारी ठरली


Protected Content

Play sound