चोपडा येथील हरेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

hareshvar mandir

 

चोपडा प्रतिनिधी । येथील हरेश्वर मंदिर परिसरात नुकतीच तापी फाऊंडेशन आणि राजे प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, हरेश्वर मंदिरात दर श्रावण सोमवारी यात्रा भरत असते. यात्रेत भाविक व यात्रेकरू मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्यामुळे सामाजिक दायित्व स्वीकारून स्वच्छ भारत अभियानांतर्गत निमगव्हाण (ता.चोपडा) येथील तापी फाऊंडेशन व राजे प्रतिष्ठान, यांचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनी मंदिर परिसरातील सुमारे दोन ट्रॅकटर ट्रॉली कचरा व प्लास्टिक गोळा करून परिसराची स्वच्छता केली आहे. कचरा वाहतुकीसाठी येथील पालिकेने ट्रॅकटरची व्यवस्था करून दिली होती.
श्री. संत गाडगेबाबा यांची शिकवण प्रत्यक्षात आणल्याचे सांगत तहसीलदार अनिल गावित यांनी मंदिर स्थळी भेट देऊन पदाधिकारी व स्वयंसेवकांचे कौतुक केले. या स्वच्छता अभियानात तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, संचालक लिलाधर बाविस्कर, प्रदीप बाविस्कर, प्रकाश पाटील, मयूर बाविस्कर, अनिल पाटील, वासुदेव बाविस्कर, अनिकेत बाविस्कर, मधुकर खंबायत यांनी सहभाग नोंदविला होता.

Protected Content