जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आज शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील विठ्ठल मंदिर चौकातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सदर कार्यक्रमास महापौर जयश्रीताई महाजन, अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, आरोग्य अधिकारी अभिजीत बाविस्कर, प्रभाग समिती अधिकारी उदय पाटील, प्रभाग समिती अधिकारी बाळासाहेब चव्हाण, आरोग्य निरीक्षक लोमेश धांडे, आरोग्य निरीक्षक लोखंडे, एस. आय. सतीश करोसिय्या, मुकदम रईस शेख, विजय हतागले, ईश्वर चौधरी, वॉटर ग्रेस प्रतिनिधी महेश माळीव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.