Home क्राईम तांबापुरात दोन गटांमध्ये दंगल

तांबापुरात दोन गटांमध्ये दंगल

0
20

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटांमध्ये दंगल उसळली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तांबापुरा भागातील धनगरवाड्यातील रहिवासी कडू शंकर थोरात यांचा मुलगा दीपक याचा ८ मे रोजी विवाह सोहळा आहे. या निमित्ताने घराजवळ जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरू असताना भोलासिंग बावरी, सोनूसिंग बावरी व दर्शनसिंग बावरी यांनी गोंधळात दुचाकी घुसवल्याने तणाव निर्माण झाला. यातून दोन्ही गटात हाणामारीला सुरूवात झाली. दोघा गटाकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला. यात अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी येण्यासाठी थोडा विलंब झाल्यामुळे दंगळ चिघळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांना परिसरात रात्रभर तळ ठोकल्यामुळे आता वातावरण निवळले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound