जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील काट्याफाईल परिसरात दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन काही तरुणांमध्ये वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सुमारास घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाऊ घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला होता.
जळगाव शहरातील शहरातील काट्याफाईल परिसरात गुरुवारी ७ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीने जाणाऱ्या तरुणाचा काही जणांना दुचाकीचा धक्का लागला. यानंतर दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. या वादाचे रुपांतर कालांतराने हाणामारीत झालेत. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. रंगनाथ धारबळे, गुन्हे शोध पथकातील राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे, गिरीश पाटील, विजय निकम, किरण वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे काही काळ तणाव पसरला होता. या प्रकरणी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते