वाल्मिक नगरात दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात ६ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाल्मिक नगरातील बगीचाजवळ दोन गटात हाणामारी झाल्याची घटना तिक्ष्ण हत्यार आणि तलवारीचा वापर करण्यात आला आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी ११ मार्च रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात एकुण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहिल्या फिर्यादीत योगेश ज्ञानेश्वर सोनवणे वय ३१ रा. वाल्मीक नगर, जळगाव यांनी म्हटले आहे की, मंगळवारी ११ मार्च रोजी रात्री ११ वाजता योगेश सोनवणे हा परिसरातील बगीचाजवळ उभा होता. त्यावेळी याच परिसरात राहणारे ज्ञानेश्वर उर्फ बाळू प्रल्हाद रायसिंगे, रोहित ज्ञानेश्वर रायसिंग, हेमंद प्रल्हाद रायसिंगे, धिरज ज्ञानेश्वररायसिंगे, सागर सुकलाल तायडे सर्व रा. वाल्मिक नगर, जळगाव यांनी जुन्या वाद उरकून काढत योगेश सोनवणे याला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर धारदार वस्तूने गळ्यावर, डोक्यावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना घडल्यानंतर जखमी योगेशने शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्‍या गटातील ललीता हेमंत रायसिंग वय ३५ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, योगेश ज्ञानेश्वर सोनवणे याने शिवीगाळ केली. याचा राग आल्याने त्याने घरातून हाता तलवार घेवून येवून अश्लिल शिवीगाळ केली. त्यावेळी महिलेचा भाऊ रोहित रायसिंगे हा समजविण्यासाठी गेला असता त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात योगेश सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content