पहूर ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत ची आज सकाळी 11 वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावाच्या विकासावर कृती आराखडा ग्राम विस्तार अधिकारी केदार साहेब गावाच्या विकासाबद्दल कृती आराखडा वाचन करत होते वाचन करत असतांना शिवसेना नेते गणेश पांढरे ग्रामपंचायत सदस्य महेश पांढरे गावातील नागरिक संजय तायडे व नागरिक गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावातील तुंबलेल्या गटारी या संदर्भात विचारणा केल्या असता. गावातील जिथे गटारी रस्त्याची आवश्यकता असताना प्रस्थापित सत्ताधारी लोकांनी अन्य वार्डात गटारीवर कामे सुरू असल्याचे निदर्शनात आणून पहूर पेठ गावात गेल्या पन्नास वर्षापासून गटारी व रस्ता अक्षरशः चाळण झाली आहे.
याबाबत सत्ताधारी कानाडोळा करत असून गावातील नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे गावातील रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे .गावातील गटारी महिना दोन महिने काढल्या जात नसल्यामुळें पहूर पेठ नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले असून असे असताना काही सत्ताधारी लोकांनी व सदस्यांनी आपल्या वार्डात गटारी रस्त्याचे काम सुरू केल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला.
दरम्यान ग्रामसभा आटोपल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य राजू जंटलमेन व त्याचा मुलगा शोयब याने ग्रामपंचायत कर्मचारी विशाल पाटील यांना मृत्यूचा दाखला केव्हा देतो. असे विचारले असता या दोघांमध्ये शाब्दिक वाचाबाची होऊन हाणामारी झाल्याचा प्रसंग घडला असून पोलिसांना प्राचाराण करण्यात आले. त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशाल पाटील यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले सदस्य व कर्मचारी यांच्या समझोताहून प्रकरण मिटविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत एकाच पक्षाच्या झेंडा खाली असताना दोन गटात हाणामारीचा प्रसंग झाल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले .
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी जि प सदस्य राजधर पांढरे होते .याप्रसंगी सरपंच अफजल तडवी ,उपसरपंच शरद भागवत पांढरे ,माजी उपसरपंच श्याम सावळे, रवींद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य महेश पांढरे ,धोंडू देशमुख, माजी उपसरपंच ईका पैलवान ,राजू पाटील सर ,शिवसेनेचे गणेश पांढरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते तथा विरोधी गटनेते यांच्याशी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गावाचा विकास शून्य झाला आहे गावाला पिण्याला पाणी नाही रस्ते नाही गटारी नाही ज्या ठिकाणी गटारीची रस्त्याच्या आवश्यकता असताना अन्य वार्डामध्ये चांगल्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे.