क्रिकेट खेळण्यावरून दोन गटात हाणामारी: ६ जण जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | क्रिकेट खेळत असताना मुलांमध्ये वाद झाल्याने तो वाढत जाऊन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले आहे. ही घटना रविवार, १६ जून रोजी दुपारी 4 वाजता शाहू नगरात घडली. जखमींमध्ये १२ वर्षीय मुलीसह ६५ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,
जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात रविवारी १६ जून रोजी दुपारी ४ वाजता काही मुले क्रिकेट खेळत होते. त्यातून त्यांच्यात वाद झाले. हा वाद वाढत जाऊन दोन गट एकमेकांना भिडले. यात हाणामारी झाल्याने शाहीनबी याकूब खान (३९), अलबिना तसलीम भिस्ती (१२), इरफान कालू खान (३५), समीनाबी शेख मुस्लीम (३४), साबेराबी सिराज भिस्ती (६५), सलमान सिराज भिस्ती (३०) सर्व रा. शाहू नगर हे सहा जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Protected Content