Home क्राईम भुसावळात दोन गटात राडा : महिलेसह कुटुंबावर जीवघेणा हल्ला !

भुसावळात दोन गटात राडा : महिलेसह कुटुंबावर जीवघेणा हल्ला !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील भीमवाडी परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका कुटुंबाला भरदिवसा बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी २६ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ येथील भीमवाडी परिसरात रक्षंदा केदारे वय २९ या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून संशयित आरोपी रोहन राजू सूर्यवंशी, नाबील शेख, शेख रमजान, सोनु भालेराव, समिर शेख, अमीर शेख आणि शोएब शेख (सर्व राहणार भुसावळ) यांनी त्यांच्या घराजवळ येऊन वाद घातला. तसेच त्यांचे वडील अनिल जंजाळे यांना शिवीगाळ करत धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे.

केवळ वडिलांनाच नाही, तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रक्षंदा केदारे आणि त्यांच्या आईलाही संशयित आरोपींना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. “आज तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे वडील जखमी झाले आहेत.

याप्रकरणी रक्षंदा केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहन राजू सूर्यवंशी, नाबील शेख, शेख रमजान, सोनु भालेराव, समिर शेख, अमीर शेख आणि शोएब शेख (सर्व राहणार भुसावळ) या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करत आहेत.


Protected Content

Play sound