हरीविठ्ठल नगरात पैशांच्या वादातून दोन गटात हाणामारी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात पैशांच्या कारणावरु न वाद होवून दोन गट एकमेकांना भिडल्याची घटना सोमवारी १७ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली. यामध्ये दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी मंगळवारी १८ जून रोजी रात्री १२.३० वाजता दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील अक्षय रुपेश साळुंखे (वय २२) हा तरुण मजूरी करतो. सोमवारी १७ जून रोजी रात्री ८.३० वाजता त्याच परिसरातील नितीन आनंदा भोई, जितू आनंदा भोई, आनंदा भोई या तिघांनी अक्षय साळुंखे याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन गंभीर दुखापत केली. याप्रकरणी जखमी अक्षय याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. तर दुसऱ्या गटातील नितीन आनंदा भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आकाश रुपेश साळुंखे याने नितीन भोई याला फोन माझे पैसे मला परत दे असे बोलून त्याला भामरे टेन्ट हाऊस जवळ भेटायला ये असे सांगितले. त्यानुासार नितीन हा त्याठिकाणी गेला असता, आकाश रुपेश साळुंखे, अक्षय रुपेश साळुंखे, रु पेश साळुखे (तिघ रा. हरिविठ्ठलनगर) यांनी नितीन भोई याला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्सोच आकाश याने त्याच्या हातातील सळई नितीनच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. तसेच तुला जास्त झाले आहे, तुला मारुन टाकीन अशी धमकी देखील दिली. नितीन भोई यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी १८ जून रोजी रात्री १२.३० वाजता परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे हे करीत आहे.

Protected Content