
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील घारडी गावात शनिवारी दुपारी दोन गटात किरकोळ वादातून चांगलीच हाणामारी झाली. तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, घारडी गावालगत भास्कर रामदास पाटील यांचे शेत आहे. या शेतातून मोहन गोविंदा पाटील यांचा पुतण्या किशोर याने बैल नेत होता. त्याचवेळी भास्कर पाटीलसह इतर सहा जणांनी शेतातून बैल नेण्यास तुम्हाला रस्ता नाही, असे म्हणत किशोर पाटील यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. या संदर्भात मोहन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भास्कर पाटीलसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर याच कारणावरुन भास्कर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन युवराज पाटीलसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.