मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचे गट रात्री मुंबईत एकमेकांना भिडल्याने खळबळ उडाली आहे. यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमधील वाद मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचे दिसून आले आहे. याबाबतची कुरबुर ही शुक्रवारीच सुरू झाली होती. यानंतर काल रात्री प्रभादेवी परिसरात दोन्ही गट एकमेकांना थेट भिडले. यातच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी दादर पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. सरवणकर यांनी केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी बचावले असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला. तर, आमदार सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावताना हा छोटा वाद असल्याचा दावा केला. मात्र यामुळे दोन्ही गटांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.