
लखनौ (वृत्तसंस्था) पक्षाच्या कार्यालयात होळीचे सेलिब्रेशन सुरु असतांना झालेल्या वादातून उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील भाजपाआमदार योगेश वर्मा यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लखीमपूर मतदारसंघातून योगेश वर्मा यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. कदाचित, त्यावरुनच हा वाद टोकाला गेल्याचे समजते. या घटनेनंतर योगेश वर्मा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. या घटनेमुळे वर्मा यांचा चांगलाच धक्का बसला असून याबाबत कुठलिही प्रतिक्रिया देण्याची मनस्थिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


