जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या सगळ्या आरोपींची आज (दि.१५) सकाळपासूनच शहर पोलीस ठाण्यात ओळखपरेड घेण्यात आली.
शहरातील सगळ्या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सगळ्याच गुन्हेगारांना बोलावण्यात आल्याने आज शहर पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची जत्राच भरली होती. दिवसभरात १०० हून अधिक आरोपींनी येथे हजेरी लावली. दरम्यान, ही ओळखपरेड का घेण्यात आली ? त्याचे कारण मात्र कळू शकलेले नाही.