गोवंशाची कत्तल करणाऱ्यांवर शहर पोलिसांची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवाजीनगरातील उमर कॉलनीत गोवंशाची कत्तल करणाऱ्यांवर पोलिसांनी मंगळवार, १८ जून रोजी सकाळी आठ वाजता छापा टाकला. याठिकाणाहून गोमांस जप्त करण्यात आले असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गोमांसची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी नगरातील उमर कॉलनीत गोवंशाची कत्तल केली जात असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यांनी पोउनि सर्जेराव क्षिरसागर, भरतसिंग पाटील, वाहेद तडवी, नरेंद्र ठाकरे, शिवाजी धुमाळ, रवींद्र सोनार, संदीप पाटील यांचे पथक तयार करुन रवाना केले. पथकाने तेथे पाहणी केली असता अशरफ जाफर शेख याच्या घराच्या कंपाऊंटमध्ये गोवंश मांस कापले जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी गोमांससह मांस कापण्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी अशरफ जाफर शेख (३४, रा. उमर कॉलनी), मोबीम मोहम्मद कुरेशी (२५, रा. काट्याफाईल) व मुक्तार बिसमिल्ला कुरेशी (३८, रा. तांबापुरा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content