यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात नागरी समस्यांकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध विकास कामांचा बट्टयाबोळ झाला असून ,शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष देण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी देखील नगर परिषदच्या प्रशासनाला वेळ नसल्याने प्रशासनाच्या कारभारा विषयी नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार हे मागील तिन ते चार महीन्यापासुन नागरी समस्या संदर्भात नगर परिषद कडे सातत्याने निवेदन देवुन पाठपुरावा करीत असुन, या निवेदनांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत नगर परिषद व्दारे बांधण्यात एपीजे अब्दुल कलाम या व्यापारी संकुलन परिसरात गेल्या अनेक दिवसापासुन मुख्य रस्त्यावरील ढापा तुटल्याने मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी छोटया मोठया वाहनांचे वारंवार अपघात होत असून,नगर परिषदच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या विविध कामांच्या विषयी या विषयी वारंवार तक्रारी करण्यात येत असुन, यावल नगर परिषद प्रशासन नागरीकांशी निगडीत या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी तक्रार करीत आक्रमक भुमिका घेतली आहे.
नगर परिषद प्रशासनाने शहरात पावसाळया पुर्वी गटारी व नालेसफाई करणे, ज्या ठीकाणी शहरात वाहतुकीस अडथळे निर्माण होत असतील त्या ठिकाणी गरजे अनुसार ढापे बांधावे तसेच स्मशानभुमीची अवस्था ही अत्यंत वाईट झाली असुन, अंत्यविधी औट्याच्या ठीकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्या जागेवर अंत्यसंस्कार करतांना नागरीकांना त्रास सहन करावा लागत असुन , सदरच्या अंत्यविधीच्या जागेस तात्काळ दुरूस्त करावी या शिवाय आदि नागरी समस्यांचे निराकरण न केल्यास आपण लोकशाही मार्गाने नगर परिषद कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याच्या इशारा त्यांनी दिला आहे .