चाळीसगाव (प्रतिनीधी) शहरातून अवजड वाहने राजरोसपणे धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या वाहतुकीला बंदी न घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांच्या वतीने वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांना दि 16 रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
वाहतुक शाखेचे हवालदार हेमंत शिरसाठ यांना निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहरात औरंगाबाद, धुळे, मालेगाव येथून येणारी अवजड वाहने ये-जा करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात अनेकांचा मृत्यु झाला आहे. शहरातील नागरीकांना या अजवड वाहनांच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. अवजड वाहनांमुळेच शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असतांना ही वाहने शहरातून धावतात. चाळीसगाव शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना धुळे-मालेगाव बायपास, औरंगाबाद बायपास मार्गाने जाण्याची सक्ती करावी व त्यांना शहरात येण्यास बंदी घालावी. येत्या 8 दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास नागरीक रस्त्यावर उतरतील असा इशारा वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक यांना देणात आला आह. निवेदनावर पत्रकार मुराद पटेल, अजय जोशी, आरिफ खाटीक, विजय गायकवाड, रवींद्र सूर्यवंशी, सचिन फुलवारी, राहुल पाटील, दिनेश घोरपडे, अक्षय गायकवाड, राहुल गायकवाड, नितीन गायकवाड, मनिष मेहता , पंकज पाटील, दिनेश साबळे, कुलदीप नेवरे, सागर झोडगे, अजय घोरपडे यांच्या सह्या आहेत.