जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील तळेगाव येथील शाळेतले विद्यार्थीप्रिय शिक्षक डॉ. अशोक कौतीक कोळी यांची बदली झाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, तळेगाव येथिल जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षक डाँ.अशोक कौतिक कोळी सर यांची प्रशासकीय बदली दि.१५ रोजी झाल्याची माहिती समोर आली आहे. एक वर्षापूर्वी आकोश सुंखदेव कोळी यांची बदली करण्यात आली होती. त्यांनी बदली अन्याय होत असल्याने औरंगाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल केला असताना दुसर्या चांगल्या शिक्षकाची बदली झाल्याने गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. ज्या शिक्षकांनी लोकसहभागातुन ४ ते ५ लाख रुपये जमा करुन शाळेला कुंपण करुन शाळेला तालुक्यात नाव लौकिक केले. त्याच शिक्षकांची बदली केल्याने गावकरी नाराज आहेत. डॉ.आशोक कौतिक कोळी शिक्षकांची प्रशासकीय बदली रद्द करण्याची मागणीदेखील करण्यात येत आहे.