पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील पुणगाव गावातील सर्व ग्रामस्थ व सद्गुरू महिला उद्योग पदाधिकारी.,आम्ही पुंणगाव ग्रामस्थ वरील विषयाला अनुसरून मागणीचे निवेदन देतो की, पुणगाव हे गाव पारोळा तालुक्यातील एक ग्रामीण व दुर्गम, दुर्लक्षित गाव असून बहादरपुर रस्त्याने शेवगे गावापासून ३ किलो मीटर अंतरावर असून २५० वस्तीचे एक छोटेसे गाव आहे. या गावात गेल्यावर जणू एक कितीतरी काळ मागे वळून पाहिले सारखे वाटते, कारण गावात जाण्यासाठी मुख्य रस्ता नाही,रस्ता पायी चालण्या योग्य नाही, एकदा या रस्त्याने गेलात तर पुन्हा जायची हिम्मत कोणी करणार नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, भौतिक सुविधा म्हणजे रेशन कार्ड नाही, शैक्षणिक व्यवस्था नाहीत. त्यामुळे या गावातील उगवत्या पिढीचे भविष्य अंधःकारमय झाले आहे.महत्वाची गरज म्हणजे आरोग्य सेवाच नाही आरोग्य सेवा नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत कित्तीतरी निष्पाप जीव गमावले आहेत. आमच्या गावाकडे लोकप्रतिनिधी ढुंकून पाहत नाहीत.


शिक्षण आरोग्य रस्ते गटारी पाणी विज एसटी बस नसल्यामुळे पुणगांव गावातील सर्व लोकांनी नुकत्याच झालेल्या 20 नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेऊन संपुर्ण ग्रामस्थांनी मतदानांवर बहिष्कार टाकला होता. पुनगाव गावातील एकुण 124 मतदारांनी मतदान केले नाही. ही माहिती समोर आली असता पारोळा तालुक्यातील सद्गुरू महिला उद्योग केंद्राच्या माध्यमातून महिलांनी महिलांसाठी सुरू केलेल्या टीम ने आमच्या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आहे. सदर महिला टीमच्या मार्गदर्शन व पुढाकाराने
आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी, पालकमंत्री आमदार, खासदार गट विकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांचेकडे आमचे गाऱ्हाने मांडत आहोत. तरी सबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आमच्या गावाकडे लक्ष देऊन सर्व नागरी सुविधा पुरवाव्यात अशी विनंती आहे.
पुनगाव ग्रामस्थ आणि आम्ही सद्गुरू महिला संघाच्या सर्व सदस्य सबंधित पदाधिकारी व अधिकारी यांना निवेदन सादर करतोकी पुणगाव या गावी आम्ही भेट दिली असता खूप विदारक चित्र दिसून आले. हे गाव अजूनही विकासापासून हज्जारोमैल दूर आहे. गावकऱ्यांच्या व्यथा आणि कथा ऐकतांना डोळ्यात आसू दाटून येत होते.पुणगाव या गावासाठीसबंधित पदाधिकारी व अधिकारी यांनी मूलभूत नागरी सुविधा म्हणजेच रस्ता, पाणी, वीज, शिक्षण व आरोग्यसुविधा पुरवणे कामी युद्ध पातळीवरून प्राधान्याने पाऊले उचलावीत असे विनंतीवजा निवेदन आपणाकडे ग्रामस्थ यांचे सह सादर करत आहोत, या निवेदनद्वारे देत आहोत. निवृत्तीसेवा उप प्राचार्य प्राध्यापक विश्वास कोळी, देवेंद्र पाटील (कुणबी समाज अध्यक्ष) पारोळा, सुवर्णा पाटील, ॲड. स्वाती शिंदे, सुनंदा शेंडे, सरला महेन्द्र पाटील, निलेश बोरसे (जनसाहस फाउंडेशन), गजानन शेंडे, अलाताफ पठाण यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर निवेदन देण्यात आले.


