पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरवासियांना ऑगस्टच्या अखेरीस पाच दिवसांआड तर ऑक्टोबर महिन्यापासून नियमीतपणे पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. पाणी पुरवठा योजनेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
आमदार चिमणराव पाटील तसेच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांनी पारोळा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. शहराचा पाणी प्रश्न हा अतिशय ज्वलंत विषय आहे. शहराचा पाणीप्रश्न हा कायमचाच मिटावा व शहराला शिरपूर प्रमाणेच शुध्द पाणीपुरवठा दैनंदिन व्हावा यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सदैव प्रयतशील होते. या बाबत आमदार आमदार चिमणराव पाटील यांनी वेळोवेळी योग्य तो आवश्यक पाठपुरावा करत पारोळा शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर करून 53.70 कोटी रुपयांना मंजुरी मिळवून आणली. या कामाची तातडीने सुरुवात करून शहराला त्वरित पाणीपुरवठा कसा उपलब्ध होईल यासाठी हे काम प्रतक्ष सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक आयोजित करीत, कामाला सुरुवात करेपर्यंत अहोरात्र प्रयत केले.
दरम्यान, आज आमदार चिमणराव पाटील व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर शिंदे, पाणी पुरवठा अभियंता प्रियंका जैन, नगर अभियंता सुमित पाटील, रंजन महाजन, प्रकल्प सल्लागार प्रतिनिधी हेमंत कोल्हे, गजानन रबाडे, तुषार शिंपी यांचेसमवेत पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सध्याचे सुरु असलेले काम व सदरील योजना पूर्णत्वास येण्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याचा सूचना यावेळी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांनी दिल्या. आमदार चिमणरावजी पाटील व अमोल पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत पारोळा शहर पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. आजअखेर या योजनेचे 75 ते 80 टक्के काम पूर्णत्वास आले असून शहराला ऑगस्ट अखेर पर्यंत 5 ते 6 दिवसांआड पाणीपुरवठा होणार असून ऑक्टोबर अखेर पर्यंत दैनंदिन पाणीपुरवठा सुरु करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी आमदार चिमणरावजी पाटील यांनी सांगितले.