मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिंडोरी मतदारसंघातील मालेगावातील मेहुणे या गावाच्या नागरिकांनी गावच्या मूलभूत प्रश्नांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. आज दिंडोरीसह राज्यातील १३ मतदारासंघात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. परंतू मालेगाव तालुक्यातील मेहूणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन केंद्रावर एकही मतदान पडले नाही. या तिन्ही मतदान केंद्रांवर एकूण 2757 मतदार आहेत.
सकाळी 11 वाजेपर्यंत याठिकाणी एकही मतदान झाले नाही. येथील ग्रामस्थांनी पाचवली पुंजलेला पाणी प्रश्न, शेतकरी समस्या तथा गावाला दुष्काळी नुकसानभरपाईसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आमच्या समस्या निकाली निघत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, अशी कडक भूमिका त्यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गावच्या प्रमुख व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर निवडणुकीनंतर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली. पण त्यानंतरही येथील तिढा सुटला नाही.