जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगर परिसरातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षाच्या नेते, पदाधिकारी महिला, तसेच स्थानिक रहिवाशांना मदत फेरी काढून सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी धान्य, निधी,कपडे,विविध संसारोपयोगी वस्तू नुकत्याच संकलीत केल्या आहेत.
रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास र रोजी शिवाजीनगर,जळगाव येथे सातारा,सांगली,कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी शिवसेना विभाग प्रमुख विजय राठोड, समाजसेवक विशाल वाघ यांच्या आयोजनानुसार शिवाजीनगरमधील आजी-माजी नगरसेवक,जेष्ठ नागरिक, शहर पोलीस स्टेशनचे पीआय निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्था व संघटनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी व स्थानिक रहिवाशांना सोबत मदत फेरी काढण्यात आली. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पीआय साहेबांच्या हस्ते माल्यार्पण करून मदत फेरीस सकाळी 11 वाजता सुरवात करण्यात आली.
मदतफेरी शिवाजीनगरमधील वेताळ बाबा मंदिर गल्ली,वज्रेश्वरी देवीचे मंदिर गल्ली,मिर्झा चौक,पाटील गल्ली,हमाल वाडा,जय विजय चौक,मराठा मंगल कार्यालय,भुरे मामलेदार प्लॉट व काळे नगर या भागात फिरली. यावेळी नागरिकांतर्फे देण्यात येणारी आर्थिक, धान्य, कपडे, विविध संसारोपयोगी वस्तू संकलित करण्यात आल्या. शिवाजी नगर मधील नागरिकांतर्फे रोख रक्कम 12, 440 व 4 ते 5 क्विंटल धान्य, डाळी,कपडे,विविध संसारोपयोगी वस्तू संकलित झाल्या. ही मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूरग्रस्तांना पोहोचवण्यात येणार आहे.
सदर मदत फेरीसाठी शिवाजी नगर मधील नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेविका गायत्रीताई शिंदे, माजी नगरसेवक संजय राठोड, ज्येष्ठ मार्गदर्शक किशोर पाटील,गणेश मोझर,शेषराव वलकर, लक्ष्मण सांगोरे, बाळाभाऊ महांगडे तसेच शिवाजीनगर मधील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.